बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (07:47 IST)

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

जीवनात सर्व सुख-सुविधा आणि भौतिक सुखे मिळावीत तसेच धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.  अशात लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीची आशीर्वाद असलेल्या घरात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप खूप फायदेशीर ठरतो- 
 
देवी लक्ष्मी चमत्कारी मंत्र
 
घरात अन्न-धन प्राप्तीसाठी
पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्
 
लक्ष्मी महामंत्र
ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
 
सुखी दांपत्य जीवनासाठी
लक्ष्मी नारायण नम:
 
माता लक्ष्मी बीज मंत्र
ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:।।
 
मनोकामना पूर्तीसाठी
ऊँ नमो भाग्य लक्ष्म्यै च विद्महे अष्ट लक्ष्म्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोद्यात
 
आर्थिक अडचण दूर करण्यासाठी
ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:
 
लक्ष्मी स्थिर मंत्र 
'ॐ स्थिर लक्ष्म्यै नम:' अथवा 'ॐ अन्न लक्ष्म्यै नम:'।
 
जेमोलॉजीनुसार शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी हिरा धारण करावा. जर हिरा घालणे शक्य नसेल तर शुक्राचा उपरत्न दतला, कुरंगी,सिम्मा घालू शकता. 
 
शुक्र ग्रहाला बल देण्यासाठी शुभ्र वस्त्रे परिधान करून ॐ द्रां द्रीं दौं सः शुक्राय नमः या मंत्राचा शुक्रवारी 5, 11 किंवा 21 वेळा जप करावा.
 
या पद्धतीने मंत्राचा जप करा
शुक्रवारी माँ लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करण्यापूर्वी सकाळी स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. नंतर घरातील मंदिर स्वच्छ करावे. मंदिरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि देवीची पूजा करावी. नंतर मंदिरात स्वच्छ आसनावर बसून स्फटिक किंवा कमळाच्या माळाने मंत्रांचा जप करावा. या प्रकारे जप केल्याने लवकरच लाभ होईल.