रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 जानेवारी 2024 (10:11 IST)

देवी लक्ष्मीचे वाहन घुबड का आहे? आश्चर्यचकित करतील हे वैज्ञानिक तर्क

एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या एक विश्वविद्यालयात व्याख्यान देत होते. तिथे मोठया संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि विव्दान उपस्थित होते. जे खूप उत्सुकतेने भाषण ऐकत होते. स्वमीजींच्या भाषणाचा मुख्य विषय होता 'भारतीय संस्कृती तथा अध्यात्मिक रहस्य'. स्वामीजी म्हणालेत "भारतीय संस्कृती तथा धर्माच्या सर्व तत्वांना वैज्ञानिक महत्व आहे. यासाठी संस्कृतीला आणि अध्यात्मला वैज्ञानिकतेसोबत जोडुन पाहता येईल. 
 
हे ऐकून एक अमेरिकन व्यक्ती त्यांच्या भाषणात दखल देत मध्येच उठून बोलला की, "वास्तवमध्ये तुमची संस्कृती महान आहे, म्हणूच तर तुमच्या इथे देवी लक्ष्मीचे वाहन घुबड आहे असे सांगितले आहे ज्याला दिवसापण दिसत नाही. आता हे सांगाल का की घुबडला देवी लक्ष्मीचे वाहन आहे असे सांगितले आहे तर या मागे वैज्ञानिक तर्क काय आहे?"
 
त्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून स्वामीजी अत्यंत सहजतापूर्वक बोलले की, "पश्चिमी देशांप्रमाणे भारतामध्ये धनलाच सर्व काही मानत नाही. आमच्या ऋषिमुनींनी चेतावनी दिली आहे की, लक्ष्मीरुपी धनाच्या असीमित मात्राच्या जवळ येताच मनुष्याला डोळे  असतांना देखील तो घुबड प्रमाणे आंधळा होवून जातो. याचाच संकेत देण्याकरिता देवी लक्ष्मीचे वाहन घुबड सांगितले आहे. यामागे हाच वैज्ञानिक तर्क आहे." स्वामी विवेकानंदंच्या  या उत्तरावर सर्व श्रोते वाह-वाह करत उठले. 
 
स्वामीजी परत बोलले, "सरस्वती, ज्ञान आणि विज्ञानचे  प्रतीक आहे आणि मनुष्याचा विवेक जागृत करणारी देवी आहे. यासाठी सरस्वतीचे वाहन हंस सांगितला आहे. जो नीर-क्षीर विवेकचा प्रतीक आहे. आता तुम्ही नक्की समजून गेला असाल की संस्कृति आणि धर्माच्या या सर्व तत्वांमागे वैज्ञानिक तर्क लपलेले आहे."
 
तिथे उपस्थित सर्व लोकांबरोबर तो व्यक्तीपण देवी-देवतांच्या वाहन बद्द्लची  ही अवधारणा ऐकून स्वमीजींच्या प्रति नतमस्तक झाला आणि त्या दिवसापासून तो व्यक्ती पण भारतीय संस्कृतिचा प्रशासक बनला.