बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

इच्छित फळ देणारा गणेश

आजच्या युगात व्यक्तीच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढतच आहेत. या इच्छापूर्तिसाठी शास्त्रात 'कलो चंडी विनायका'...ची पूजा करावी असे म्हटले आहे. अर्थात कलियुगात चंडी‍ किंवा विनायक लवकर इच्छित फळ देणारा देव आहे. वक्रतुंडाच्या पूजेशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरवात होत नाही. त्यांच्या प्रार्थनेशिवाय कोणतेही आध्यात्मिक कार्य सफल होत नाही.

सनातन धर्माच्या प्रत्येक व्यक्तीकडून त्यांची पूजा नेहमी केली जाते. गणेशाच्या मूर्तीची अनेक रूपे आहेत. दुसर्‍या कोणत्याही देवाची इतकी रूपे नाहीत, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. स्वस्तिकाचे रूपही संकटनाशक आहे. तो सर्व मानवाच्या सांसारीक व आध्यत्मिक कल्याणाचे प्रतीक आहे. रिद्धी सिद्ध‍ी, लाभ-शुभ, स्वस्तिक, ॐ, कलश, त्रिशूळ, अंकुश, सुपारी, श्रीफळ, संपत्ती किंवा संतान प्राप्तीसाठी व्यक्तीने जलत्व उपासना केली पाहिजे. जलत्वाची आवश्यकता असणार्‍या व्यक्तीसाठी भगवान एकदंत प्राणदेवता आहे असे शास्त्रात सांगितले आहे. याची सगुण-निर्गुण अशा दोन्ही प्रकारे उपासना करू शकता.

उपासकाने गणेश मूर्ती घरात इशान्य कोनात पूजेच्या ठिकाणी ठेवावी. मूर्ती एक इंचापेक्षा मोठी किंवा बारा इंचापेक्षा लहान नसावी. गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला करून उपासना करावी. पूजेमध्ये रवा, फुले, दुर्वा, शत पत्रे व मोदकाचा उपयोग करावा.

निर्गुण उपासनेत रवा, फुले उपासकाचा दृढविश्वास, दुर्वा सुख दु:खाच्या भावना, शतपत्रे ब्रम्हदेवाला प्राप्त करण्यासाठी आणि मोदक आनंदाचे प्रतीक आहेत. गणेशाची स्तुती करण्यासाठी सर्व देवता, ऋषी, आचार्यांनी मंत्र, स्त्रोत, नामाची रचना करून त्यांचे गुणगान गायिले आहे. त्याचे विभाजन सहा वगवेगळ्या संप्रदायात केले आहे. त्यांचे वर्णन खालील प्रमाणे

1. महागणपती संप्रदाय 2. हरिद्रा गणपती संप्रदाय 3. उच्छिष्ट गणपती संप्रदाय 4. नवनीत गणपती संप्रदाय 5. सुवर्ण गणपती संप्रदाय 6. संतान गणपती संप्रदाय.

पहिल्या संप्रदायाचा उपयोग साधारणत: महाविद्या साधनेसाठी केला जातो. द्वितीय, तृतीय गणपती संप्रदाय तांत्रिक क्रियाशी संबंधित आहे. शेवटचे तीन संप्रदाय गणेश प्रेमी प्राण्यांसाठी आहे. त्याचे वर्णन गणेश पुराणातील प्राण रूपात आहे. सामान्यांसाठी गणपतीचे बारा नावेच पुरेशी आहेत.