1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

ज्ञानेंद्रिये - सवयी

ज्ञानेंद्रिये सवयी
WD
पंचेंद्रिये अग्नीसारखी आहेत. जे काही तुम्ही या पंचेंद्रियमध्ये टाकाल ते अग्नीत जळून जाते. विषारी पदार्थाच्या ज्वलनामुळे प्रदूषण आणि घाण वास निर्माण होतो. पण तुम्ही चंदन जाळलेत तर सुगंध दरवळतो. जीवनाला आधार देणारा अग्नी नाशही करू शकतो. अग्नी घराला तप्त करू शकतो किंवा जाळू शकतो. होळीभोवती उत्सव साजरा करतात. चितेच्या अग्नीभोवती शोक असतो. जळणारा टायर विषारी वायू निर्माण करतो. तुपाचा दिवा तुमचा मार्ग उजळतो आणि परिसर शुद्ध करतो. तुमच्यातील अग्नी हा धूर आणि प्रदूषण निर्माण करतो किंवा तुम्ही कापरासारखे जळून उजेड आणि सुगंध निर्माण करणे तुम्हाला आवडेल का?

एखादा साधुपुरुष हा प्रेमाचा प्रकाश आणि सुगंध निर्माण करतो, तो जीवनसखा आहे.जो अग्नी प्रकाश आणि ऊब निर्माण करतो तो उच्च दर्जाचा आहे. जो अग्नी प्रकाश आणि थोडा धूर निर्माण करतो तो हलक्या दर्जाचा हो. या वेगवेगळ्या अग्नीमधील फरक ओळखण्यास शिका. जेव्हा तुमची इंद्रिये चांगुलपणात गुंतली असतील तेव्हा तुम्ही प्रकाश व सुगंध निर्माण कराल. जेव्हा ती अशुद्धतेमध्ये गुंततात, तेव्हा धूर आणि अंधार निर्माण करतात. संयम तुमच्यातील अग्नीचा दर्जा बदलतो.

-श्री श्री श्री रविशंकर

(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)