1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. देवांना वाहण्याच्या फुलांचे महत्त्व

देवांना वाहण्याच्या फुलांचे महत्त्व

हिंदुधर्माच्या प्रथांमध्ये रविवारी सूर्यदेवाची उपासना इच्छापूर्तीसाठी शुभ मानली जाते. 'सूर्यभक्ती' मग ती नामस्मरण, स्तोत्र पाठ, अभिषेक, पूजा, सूर्यनमस्कार कोणत्याही स्वरूपात केल्यास आयुष्य, शक्ती, आरोग्य, मान-सन्मान, वैभव आणि ज्ञान प्रदान करणारी मानली गेली आहे.

हिंदुधर्मामध्ये पाच प्रमुख पूजनीय देवी-देवतांमध्ये साक्षात सूर्यदेवाची पूजा दररोज करणे मंगलकारी मानले गेले आहे. सूर्यपूजेमध्ये सुख प्राप्त करण्यासाठी काही सोपे उपाय प्रभावकारी मानले गेले आहेत. यामधीलच एक आहे - सूर्यदेवाला वेगवेगळ्या प्रकारचे फूल अर्पण करणे. प्रत्येक वेगळ्या फुलाचे महत्त्व विशेष फलदायी आणि इच्छापूर्ती करणारे मानले गेले आहे.
 
कन्हेर - संकटमुक्ती, अपार सुख आणि धनसंपत्ती, ऐश्‍वर्य मिळते.
 
पांढरे फूल - भाग्यबाधा दूर होते.
 
चाफा - जोडीदाराच्या रूपात सुंदर मुलगी मिळते.
 
पलाश - सुख-शांती मिळते.
 
मंदार - त्वचा आणि कुष्ठरोग दूर होतात.
 
मोगरा - सर्व सुखसुविधा आणि वैभवाची प्राप्ती होते.