देवासाठी घरं बांधणारी माणसं
- महेश जोशी
|
औरंगाबाद येथील 'अंजली मार्बल्स्'च्या सोनी परिवाराची चौथी पिढी संगमरवरच्या देवघराची निर्मिती करण्याच्या व्यवसायात आहे. १९६२ पासून त्यांच्या संगमरवरी देवघरांना भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंडसहीत जगभरात मागणी आहे. देवघराच्या स्थापनेपासून त्याच्या विक्रीपर्यंतची अत्यंत शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे. संजय सोनी यांनी या विषयी माहिती दिली. देवघराच्या निर्मितीसाठी मकराना मार्बलचा वापर केला जातो. भारतात नंबर एकचे संगमरवर अशीच याची ओळख आहे. राजस्थानच्या मकराना येथून हा संगमरवर आणला जातो. या मार्बलची केमीकल पॉलिशींग केली जाते. सोबत सिलीकॉन कोटींगही येतेच. यासाठी मार्बलला तब्बल एक हजार वेळेस घासले जाते. यामुळे मार्बलमधील छिद्रे, फटी, भेगांमध्ये 'अंजली'चे खास केमिकल जावून बसते. याचा फायदा म्हणजे देवघराला तेल, हळद-कुंकू आदीचे डाग लागत नाहीत. शिवाय याची चमकही कायम राहते. प्रत्येक देवघरामध्ये लाईट फिटींगसाठी एक होल व हूक दिले जाते. सणा-सुदीच्या काळात तोरण लावण्यासाठी चार वेगळे हुकही देवघरात असतात.
|
देवघराची निर्मिती अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. संजय सोनी सांगत होते. संगमरवराची कटिंग अमृतमुहूर्तावर सुरू होते. त्यापूर्वी गोमूत्र व गंगाजलाने जागा पवित्र केली जाते. 'ॐ नमो भगवते, वासुदेवाय नमः' चा अकरा वेळा जप करून संगमरवर कापण्यास सुरूवात होते. प्रत्येक मंदिराखाली स्फटिक लावले जातात. जगात सर्वाधिक ऊर्जा देणारे म्हणून स्फटिकाची ओळख आहे. पूजेतून नसा-नसात उर्जेचा संचार व्हावा म्हणून स्फटिकाचा वापर केला जातो,असे सोनी यांनी सांगितले.
|
प्रतिष्ठानातून निघतांना उदबत्ती फिरवून व गोत्राचा उच्चार करूनच देवघराची पाठवणी होते. यजमानांच्या घरी गोमुत्राने जागा शुद्ध करून मगच देवघर ठेवले जाते. सोनी म्हणाले, शास्त्र सांगते की मांडी घातल्यावर बेंबीवर देवाची स्थापना व्हावी. देवाची स्थापना 'सवई'मध्ये करण्याची पद्धत आहे. 'सवई' म्हणजे जमिनीपासून सव्वा पाच, सव्वा सहा, सव्वा आठ सेंटीमीटर, उंच असे अंतर .देवघरात देव ठेवण्याची जागा तशीच केलेली असते. मंदिरांमध्येही हा नियम पाळला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. देवघर घरी नेल्यानंतर पुढील दोन महिन्यात कोणत्याही कारणाने तो परत करावा वाटला तरच तशी सोयही उपलब्ध होते. एखाद्यावेळी देवघर आणल्यानंतर काही अनिष्ट घटना घडली, घरात वाईटाला सुरूवात झाली, ब्राह्मण -वास्तुतज्ज्ञ त्यास योग्य मानत नसल्याचे लक्षात आले, तर ग्राहकाचे पूर्ण पैसे परत करतो, असे सोनी यांनी म्हणाले.
|
आजघडीला भारतासहित कॅनडा, न्यूझीलंड, अमेरिका आदी देशांमध्ये हे देवघर पाठविले जातात. परदेशात पाठविल्या जाणार्या देवघरांची बांधणी तेथील यजमानांना करावी लागते. याची माहिती देणारी बहुभाषिक सीडी, रेखाटने व आवश्यक केमिकल्स सोबत पाठविले जातात. भारतात कोठेही देवघर हवे असल्यास वाहतुकीचा खर्च अंजली मार्बल्स् करते. अंजली मार्बल्स्च्या चार पिढ्यांनी या व्यवसायात विश्वासार्हता कमावली आहे. देवघरांच्या निर्मितीला केवळ तांत्रिक रुप न देता सोनी परिवाराने त्यास धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान दिले. ईश्वराच्या भक्तीत लीन होण्यासाठी याहून पावन मार्ग कोणता असणार?
