गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By सौ. कमल जोशी|

पैसा आणि प्रेम

पैसा आणि प्रेम
लोभ दिवसेंदिवस वाढतच जातो. लाभ झाला तरी लोभ सुटत नाही आणि समाधान होत नाही.      
प्रापचिक काम करताना भगवंताचे अनुसंधान कायम असाव

हिरण्याक्ष म्हणजे सोने-पैसा. पैशावर लक्ष ठेवणारा लोभी असतो. डोळ्यामध्ये प्रेमभाव असावा. पैसा नाही, डोळ्यातून प्रेमाचा वर्षाव व्हावा. तोच तर अमृताचा वर्षाव आहे. ज्याला पैशाशिवाय दुसरे दिसत नाही तो पाप करतो. पापाचा बाप् लोभ आहे. लोभ दिवसेंदिवस वाढतच जातो. लाभ झाला तरी लोभ सुटत नाही आणि समाधान होत नाही. पैशाच्या लोभाने पाप होते. धरती रसातळाला गेली तरी डोळ्यामधली पैशाची धुंदी जात नाही म्हणून प्रेम असावे.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)