हनुमंताची आरती
- समर्थ रामदासस्वामी
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय हनुमंता ।। तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।। दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।। थरथरिला धरणीधर मानीला खेद ।। कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।। रामी रामदासा शक्तपचा शोध ।।जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।