हिंदू धर्म जगातील तिसरा मोठा धर्म
हिंदू धर्म हा ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मियांनंतर जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे, 'प्यू' सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की भारत, नेपाळ आणि मॉरिशस या देशांमध्ये हिंदू धर्मियांची संख्या सर्वांत जास्त आहे. जगभरातील विविध धर्मांचे अस्तित्त्व असलेल्या भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे.
या सर्वेक्षणानुसार हिंदू आणि ख्रिस्ती नागरिक हे त्यांचे अधिक्य असलेल्या देशांतच राहतात. हिंदू धर्मियांच्या एकूण लोकसंख्येपैकी ९७ टक्के भारत, नेपाळ आणि मॉरिशस या देशांमध्ये राहतात. तर ८७ टक्के ख्रिस्ती हे ख्रिस्तींचे वर्चस्व असलेल्या १५७ देशांमध्येच राहतात.
हा अहवाल तयार करण्यासाठी विविध देशांच्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या जनगणनेच्या नोंदी आणि सर्वेक्षणांचा अभ्यास करण्यात आला आहे. जागतिक लोकसंख्येचा आधार घेऊन आणि विविध धर्मांच्या नागरिकांची टक्केवारी या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या टक्केवारीनुसार जागतिक लोकसंख्येपैकी ३२ टक्के (२ अब्ज २० कोटी नागरिक) हे ख्रिस्ती धर्मीय आहेत. तर २३ टक्के (१ अब्ज ६० कोटी नागरिक) हे मुसलमान धर्मीय आहेत. हिंदू धर्मियांची संख्या १५ टक्के, म्हणजे एक अब्ज आहे. सात टक्के (५० कोटी) बौद्ध आणि ०.२ टक्के (१ कोटी ४० लाख) ज्यू धर्मीय आहेत.
जगात सहा टक्के (४० कोटी) आदिवासी नागरिक हे आफ्रिकी, चिनी, मूळ अमेरिकी (रेड इंडियन) आणि ऑस्ट्रेलियाचे मूळ निवासी (मूरी, नुन्गा आदी) आहेत. तर एक टक्का (५ कोटी ८० लाख) बहाई, जैन, शीख, शिंटोवादी, ताओवादी, तेन्रीक्यो, विक्का आणि पारशी या धर्माचे आहेत.