शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

होळीला तयार करा हनुमानाची कणकेची प्रतिमा, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

होळीच्या दिवशी अर्थातच पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्ना‍नादि करून स्वच्छ ताटलीत खाण्याचं तेल, बेसन आणि उडीद डाळीची कणीक भिजवून त्याने हनुमानाची मूर्ती तयार करावी. 
 
आता श्रद्धापूर्वक या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा करावी. पूजन करावे. मूर्तीसमोर तेल आणि तुपाचा दिवा लावावा. मालपुआ, दुधाने तयार गोड पदार्थ किंवा आपल्या इच्छा आणि सामर्थ्याप्रमाणे नैवेद्य दाखवावा.
 
नंतर 27 विड्याची पाने आणि सुपारी व इतर मुख शुद्धीच्या वस्तू घालून विडा तयार करावा आणि हनुमानाला अर्पित करावा.
 
नंतर 108 वेळा या मंत्राचा जप करावा -
 
मंत्र- नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।
 
यानंतर हनुमानाची आरती, स्तुती करून मनोकामना स्मरण करावी आणि प्रार्थना करत या मूर्तीला एखाद्या पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित करावे.
 
यानंतर एखाद्या ब्राह्मण किंवा उपाशी व्यक्तीला खाद्य पदार्थ देऊन व दान देऊन ससन्मान विदा करावे. 
 
असे केल्याने बजरंगबली सर्व मनोकामना पूर्ण करतात.