शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (10:14 IST)

होळीच्या दिवशी एक खास उपाय, बदलून देईल तुमचं आयुष्य

असे मानले जाते की होळीच्या दिवशी काही उपाय केल्यास शारीरिक, मानसिक आणि कोणत्याही कामात येणारे अडथळे, आर्थिक त्रास इत्यादी सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया होळीवर करण्यात येणारा उपाय याबद्दल जेणेकरुन तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.
 
होलिका दहन या दिवशी करा हा उत्तम उपाय Holi Dahan Upay 
 
होळी उपायाचा नियम
होळीच्या दिवशी हा चमत्कारिक उपाय खूप प्रभावी ठरतो. हा प्रयोग करताना शुद्धतेची आणि पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी. एवढेच नाही तर हा उपाय करताना गोपनीयतेची काळजी घ्या. अत्यंत महत्वाचे म्हणजे हा उपाय आपण करत असल्याचे कोणालाही सांगू नये.
 
असे करा
होलिका दहनाच्या आधी स्नान वगैरे करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. यानंतर एक श्रीफळ घ्या आणि स्वत:वरून आणि कुटुंबातील सदस्यांवरुन घड्याळाच्या दिशेने 7 वेळा ओवाळून घ्या. जर एखाद्या सदस्याला जास्त त्रास असेल तर त्यावरुन वेगळ्याने श्रीफळ ओवाळून घ्या. यानंतर आपल्या मनातील त्रास आपल्या इच्छित देवतेला सांगून, होलिका दहनाच्या अग्नीमध्ये ते फळ टाका. यानंतर 7 वेळा होलिका परिक्रमा करा आणि तुमचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर भगवंताला फळे किंवा मिठाई अर्पण करा आणि नंतर ते स्वतः ग्रहण करा.
 
हे उपाय करताना विशेष काळजी घ्या की उपाय करणाऱ्या व्यक्तीने मादक पदार्थ आणि मांस इत्यादींचे सेवन मुळीच करु नये.