बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Updated : गुरूवार, 17 मार्च 2022 (08:50 IST)

होळीच्या दिवशी या 17 पैकी 1 उपाय केला तरी धन लाभ होईल

होळी हा रंगांसह समृद्धीचाही सण आहे. येथे आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत ज्याने तुमचे काम नक्की होईल.
 
1. होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वत:वरुन काढलेले उटणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
2. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरतं.
 
3. भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे.
 
4. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात.
 
5. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो.
 
6. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करा.
 
7. घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुख-शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा.
 
8. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो.
 
9. वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा. यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी.
 
10. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या. दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा.
 
11. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस, अरसी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगवा.
 
12. होलिका दहनाच्या रात्री तगर, काकजंघा, केसरला “क्लीं कामदेवाय फट् स्वाहा” या मंत्राने उर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होतं.

13. होळीच्या रात्री “ॐ नमो धनदाय स्वाहा” या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते.
 
14. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो.
 
15. कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल.
 
16. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.
 
17. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरुन ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात.