1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 2 एप्रिल 2023 (10:52 IST)

ब्रिटनच्या 3 नागरिकांना तालिबानकडून अटक

ब्रिटनच्या तीन नागरिकांना आफिगाणिस्तानातील तालिबान सरकारने अटक केली आहे. मानवी हक्कासंदर्भात कार्य करणाऱ्या एका संस्थेने ही माहिती बीबीसीला दिली आहे. प्रीसिडियम नेटवर्क या मानवी हक्कासंदर्भात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने स्कॉट रिचर्ड्स यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 'ताब्यात असलेल्या पैकी एक जण 53 वर्षांचे व्यक्ती आहेत. त्यांचे नाव केव्हिन कॉर्नवेल असून ते ब्रिटनच्या मिडल्सब्रो येथील रहिवासी आहेत.' ते एक आरोग्य कर्मचारी आहेत.
 
रिचर्ड्स यांनी सांगितले की 'केव्हिन आणि एका अन्य व्यक्तीला 11 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एका व्यक्तीला तालिबानकडून ताब्यात घेण्यात आले.'
 
ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की या 'तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.'
प्रीसिडियम नेटवर्क ही एक ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. हिंसाचार आणि गरिबीमुळे संकटात आलेल्या लोकांच्या मदतीसाठी ही संस्था कार्य करते.
 
रिचर्ड्स यांनी सांगितले की प्रीसिडियम नेटवर्कतर्फे कॉर्नवेल यांचे प्रतिनिधित्व केले जात आहे. कॉर्नवेल हे आरोग्य कर्मचारी आहेत.
 
रिचर्ड्स यांनी पुढे सांगितले की आतापर्यंत या तिघांवर औपचारिकरीत्या कुठलेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत.
 
संस्थेला प्राप्त माहितीनुसार कॉर्नवेल यांच्या खोलीतील कपाटात एक बंदूक सापडली. त्यासाठी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कॉर्नवेल यांनी तालिबानकडून परवाना घेऊनच बंदूक बाळगली होती. पण आता तो परवाना सापडत नसल्याचे कॉर्नवेल यांचे म्हणणे आहे. रिचर्ड्स यांनी स्पष्ट केले आहे की 'संबंधित परवाना सापडत नाहीये पण आम्ही अशा अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत ज्यांनी परवाना प्रत्यक्ष पाहिला होता.'
 
'असं देखील असू शकतं की तपासणीवेळी परवाना आणि बंदूक हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले असतील. कदाचित हे सर्व एखाद्या गैरसमजातून देखील घडले असू शकते,' रिचर्ड्स सांगतात.
 
तिसऱ्या व्यक्तीचे नाव माइल्स रॉटलेज असे आहेत. तत्या 23 वर्षांच्या आहेत आणि ते बर्मिंगहमच्या रहिवासी आहेत. 2021 मध्ये जेव्हा तालिबानने सत्ता हस्तगत केली त्यावेळी त्यांना ब्रिटिश सेनेनी सुरक्षितरीत्या अफगाणिस्तानबाहेर काढलं होते. पण त्या पुन्हा त्या ठिकाणी गेल्या.
 
रॉटलेज यांनी अनेक संकटग्रस्त देशांचे दौरे केले आहेत आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील या दौऱ्याचे फोटो टाकल्यामुळे ते चर्चेत आले होते.
 
रिचर्ड्स यांनी स्काय न्यूजला सांगितले की आमच्या माहितीनुसार 'तिघेही सुखरूप आहेत आणि तिघांसोबतही चांगली वर्तणूक केली जात आहे.'

Published By- Priya Dixit