गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (09:05 IST)

Earthquake :अंदमान निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलची तीव्रता 4

Earthquake tremors in Andaman and Nicobar National Center for Seismology
गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी 24 मार्च रोजी छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची  तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. 

अंदमान निकोबारमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 मोजण्यात आली आहे. सध्या तरी कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, शुक्रवारी रात्री 11:56 च्या सुमारास पोर्ट ब्लेअरमध्ये भूकंपाचे जाणवले.  
 
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी 24 मार्च रोजी छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. 
 
Edited by - Priya Dixit