1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (12:28 IST)

61 व्या वर्षी 88 वे लग्न, प्लेबॉय किंग म्हणून प्रसिद्ध

एका व्यक्तीने आपल्या 61 वर्षांच्या आयुष्यात 87 वेळा लग्न केले आणि आता तो 88 वे लग्न करणार आहे. ही व्यक्ती आता ज्याच्याशी लग्न करत आहे ती त्याची माजी पत्नी आहे. त्याने 86 वे लग्न तिच्यासोबत केले होते मात्र महिनाभरात ती निघून गेली होती. 
 
कान म्हणून ओळखल्या जाणारा हा माणूस इंडोनेशियातील जावा येथे राहत आणि या व्यक्तीचे नाव मजलेंगका असून शेतीचे काम करतात.
 
कान यांच्याप्रमाणे त्याने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी पहिले लग्न केले होते. त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. 
 
आता त्यांना माजी पत्नीने परत येण्याची ऑफर दिल्यास ते नकार देऊ शकले नाही. ते म्हणाले आम्हाला वेगळे होऊन खूप दिवस झाले आहेत पण दोघांमधील प्रेम अजूनही कायम आहे. त्यांनी म्हटले की लग्न एका महिन्यातच तुटले असले तरी ती महिला अजूनही त्याच्यावर प्रेम करते.
 
कान यांनी मीडियाला सांगितले की माझ्या वाईट वागणुकीमुळे माझ्या पत्नीने लग्नाच्या दोन वर्षांनी घटस्फोट मागितला. त्यांना खूप राग येत असल्याचे त्यांनी कबुली दिली आणि नंतर महिलांना आकर्षित करण्यासाठी अध्यात्माकडे वळल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की मला महिलांच्या भावनांशी खेळायचे नव्हते. काहीही चुकीचे करण्यापेक्षा लग्न करणे चांगले होते.
 
कान यांना 'प्लेबॉय किंग' म्हणूनही ओळखले जाते. ते म्हणाले की जर एखादी महिला त्यांच्या आयुष्यात पुन्हा येण्यास इच्छुक असते तर ते नकार देत नाही. कानसोबत आता किती बायका राहतात आणि किती मुले आहेत हे माहीत नाही.