इराणमध्ये भीषण बस अपघात, २१ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
इराणच्या दक्षिण भागात एक भीषण बस अपघात झाला आहे. यामध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या दक्षिण भागात एक भीषण बस अपघात झाला आहे. येथे बस उलटल्याने किमान २१ जणांचा मृत्यू झाला. फार्स प्रांताच्या आपत्कालीन संघटनेचे प्रमुख यांनी सांगितले की, प्रांतीय राजधानी शिराझच्या दक्षिणेस झालेल्या या अपघातात ३४ जण जखमी झाले आहे.
ते म्हणाले की, बचाव कार्य सुरू आहे. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आणि सविस्तर तपासानंतर अतिरिक्त माहिती आणि अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल. अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी ११:०५ वाजता घडली आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, घटनेची कारणे तपासली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik