गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (11:50 IST)

दुबईत भव्य हिंदू मंदिर जवळजवळ तयार,यूकेमध्ये प्रत्येक घरात तिरंगा मोहीम सुरू

Photro @ social Media दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये नवीन भव्य हिंदू मंदिर जवळजवळ तयार आहे. मंदिरात 16 शिल्पे, एक नॉलेज हॉल आणि कम्युनिटी हॉल आहे. सिंधू गुरु दरबार मंदिराचे विश्वस्त राजू श्रॉफ म्हणाले की, "दसर्‍याला (5 ऑक्टोबर) मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. हे मंदिर जेबेल अलीमधील अमिरातीच्या टॉलरन्स कॉरिडॉरमध्ये आहे. या परिसरात एक गुरुद्वारा, एक हिंदू मंदिर आणि अनेक चर्च आहेत. ४ ऑक्टोबर रोजी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
या मंदिरात 16 देवी देवतांच्या मूर्ती असून एक ज्ञान कक्ष, कम्युनिटी हॉल आहे. झेबलआली मध्ये अमिरातीच्या कॉरीडॉर ऑफ टॉलरन्स मध्ये हे मंदिर आहे. या भागात पूर्वीच गुरुद्वारा, हिंदू मंदिर आणि अनेक चर्चेस आहेत. नव्या हिंदू मंदिराच्या उदघाटन समारंभाला युएई सरकारी अधिकारी आणि अन्य प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
 
या मंदिरात पूजा, धार्मिकअनुष्ठाने करता येणार आहेत. दोन भागात हे मंदिर खुले होणार आहे. प्रथम फक्त प्रार्थनास्थळ खुले होईल आणि दुसरा भाग मकरसंक्रांति दिवशी सुरु केला जाईल. ज्ञानकक्ष आणि कम्युनिटी हॉल तेव्हा खुला होणार आहे.
 
या मंदिरात लग्न, हवन व अन्य खासगी कार्यक्रम करता येतील असे सांगितले जात आहे. सकाळी 6 ते रात्री 9अशी मंदिराची वेळ असून एकाचवेळी हजार ते १२०० भाविक एकाचवेळी येथे पूजा करू शकतील. क्यूआर कोडच्या सहाय्याने भाविक सुरक्षा आधारित स्लॉट बुकिंग सिस्टीम येथे लावली गेली असून तो कोविड 19 प्रोटोकॉलचाही एक भाग आहे. दिवाळी आणि नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित होणार आहेत.हिंदू समुदायाने मंदिराची तारीफ केली आहे