मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)

'या' माणसाच्या पोटातून काढले किलोभर नखं, स्क्रू आणि खिळे

लिथुआनियात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पोटात एक किलोपेक्षाही जास्त नखं, स्क्रू आणि नटबोल्ट आढळल्यामुळे खळबळ माजली आहे.
 
या व्यक्तीची शस्त्रक्रिया करून पोटातून या सगळ्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली आहे.
 
क्लाईपेडा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली.
 
यादरम्यान पोटात आढळून आलेल्या वस्तूंची लांबी 10 सेंटीमीटरपर्यंत होती, अशी माहिती डॉ. सारुनास डॅलिडेनास यांनी दिली.
 
ही एक दुर्मिळ केस होती, असं डॉ. डॅलिडेनास यांनी सांगितलं.
 
क्लाईपेडा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने याबाबत लिथुआनियाच्या सरकारी माध्यमाने याबाबत एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये यासंदर्भात एक फोटोही देण्यात आला आहे.
 
बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण दाखल झाला होता.
 
पोटाच्या खालील भागात दुखत असल्याने रुग्णाला असह्य झालं होतं. त्याला अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
या रुग्णावरील शस्त्रक्रिया तीन तास चालली. त्यानंतर त्याची प्रकृती आता स्थिर आहे, तरी त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे, असं हॉस्पिटलने सांगितलं.