शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (17:16 IST)

सापाला कोळसा फेकून मारला, बघता बघता साडेसात कोटींचे नुकसान

साप हा असा प्राणी आहे की जगातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती घाबरतो. साप विषारी असो वा नसो, साप बघून एक विचित्र अस्वस्थता जाणवते. अमेरिकेतील मेरीलँडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या महिन्यात आपल्या घरात एक साप फिरताना पाहिला. या सापाला मारण्यासाठी त्याने जे केले त्याचा पश्चात्ताप कदाचित त्याला आयुष्यभर राहील. सापाला मारण्यासाठी घरातील चुलीत जळत असलेला कोळसा त्या माणसाने उचलला होता, पण या कोळशामुळे सापाला काही इजा झाली की नाही हे कळू शकले नाही, पण त्या व्यक्तीचे संपूर्ण घर जळून राख झाले.
 
ही बाब 23 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. अधिका-यांनी सांगितले की, घरातील आग विझवण्यासाठी सुमारे 75 फायरफाइटर्स पाठवण्यात आले. बऱ्याच प्रयत्नानंतर घरातील आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत सर्व काही जळून राख झाले होते. मॉन्टगोमेरी काउंटी फायर अँड रेस्क्यूचे प्रवक्ते पीट पीरिंगर यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने घरात दिसलेल्या सापाला जळत्या कोळशाने फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा कोळसा सापाला मारण्याऐवजी घराला आग लावण्यात उपयुक्त ठरला.
 
या घटनेची छायाचित्रे पीटने ट्विटरवर शेअर केली आहेत. तसेच आगीचे कारण अपघाती असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मालकाला कोळशाने साप मारायचा होता पण कोळशाच्या तुकड्याने त्याच्या घराला आग लागली. आगीमुळे व्यक्तीला साडे सात कोटींचे नुकसान सहन करावे लागले. घराचा मोठा भाग जळून राख झाला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या घटनेत खूप नुकसान झाले पण सापाचे काय झाले हे समजू शकले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आग तळघरातून लागली होती. यानंतर आग हळूहळू घरभर पसरली. या आगीत बहुतेक घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले. घर जळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घरातून निघणारी ठिणगी यामध्ये स्पष्टपणे दिसते. काही काळापूर्वी अशीच एक घटना जास्त व्हायरल झाली होती. यामध्ये एक व्यक्ती आपल्या घरात दिसलेल्या कोळीला मारण्याच्या प्रकरणात आपले नुकसान करत होता. कोळी मारल्यामुळे त्या माणसाच्या घरात आग लागली होती, त्यात त्याला खूप त्रास झाला होता.