गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:43 IST)

माकड सलून मध्ये दाढी करण्यासाठी गेला, व्हिडीओ व्हायरल

The monkey went to the salon to shave
आपण अनेकदा माणसांना दाढी करताना किंवा सेट करताना पहिले असणार. पण आपण कधी माकडाला दाढी करताना पहिले आहे का? हे खरे आहे. सोशल मीडियावर सध्या माकडाने दाढी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि ते देखील सलूनमध्ये जाऊन .
अहवालानुसार, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये एक माकड सलूनमध्ये खुर्चीवर आरामात बसलेला दिसत आहे, आणि एक माणूस हातात ट्रीमर घेऊन त्याची दाढी बनवत आहे. 
हा कुठला व्हिडीओ आहे हे अद्याप समजू शकले नाही. परंतु व्हिडिओमधील इतर लोकांना बघून हा व्हिडीओ परदेशातातील असल्याचे दिसत आहे. 
या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोकांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा मजेशीर व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये माकड सलून मध्ये आरामात आरशासमोर खुर्चीवर बसला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मजेशीर कॉमेंट्स करत आहे.