बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (12:27 IST)

बोईंग विमानाने उड्डाण करताच त्याचे चाक पडले

अमेरिकेहून जपान जाणाऱ्या प्रवासी विमानाचा अपघात झाला असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून उड्डाण करताच विमानाचे चाक घसरून पडले.

युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइटचे चाक घसरले. या विमानात 235 प्रवासी आणि 14 क्रू मेम्बर्स होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाने उड्डाण करताच त्याच्या सहा टायरपैकी एक टायर विमानापासून वेगळा झाला आणि सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये एका कारवर पडला. त्यामुळे कारचा मागील भाग खराब झाला. या घटने नंतर विमान तातडीनं उतरवण्यात आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवण्यात आले.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या विमानाच्या प्रत्येक मुख्य लेन्डिंग स्ट्रेटवर सहा चाके आहे. हे विमान काहीही त्रुटी आढळ्यास किंवा गहाळ झाल्यास सुरक्षितपणे उतरण्यासाठी डिझाईन केले आहे. विमानाला लॉस एंजेलिसला वळवण्यात आले असून ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit