मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (23:18 IST)

बलुचिस्तान: पाकिस्तानचे राष्ट्रपती अल्वी समारंभातून बाहेर पडताच स्फोट, 5 सुरक्षा कर्मचारी ठार, 28 जखमी

बलुचिस्तान प्रांतातील सिबी जिल्ह्यात एका वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या भेटीदरम्यान मंगळवारी झालेल्या स्फोटात किमान पाच सुरक्षा कर्मचारी ठार आणि 28 जण जखमी झाले. हा स्फोट एका मोकळ्या जागेजवळ झाला जेथे उत्सव सुरू होता. या स्फोटात पाच सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान हा दीर्घकाळ चाललेल्या हिंसक बंडखोरीचा बालेकिल्ला आहे .येथे  वार्षिक सोहळ्यात राष्ट्रपती अल्वी उपस्थित होते. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून बलुच बंडखोर गटांनी या भागात यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती अल्वी वार्षिक उत्सवात सहभागी झाले ते तिथून निघून गेल्यानंतर हा स्फोट झाला. हा आत्मघातकी स्फोट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, तपास सुरू आहे. 28जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये बहुतांश सुरक्षा कर्मचारी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.