Bangladesh:बांगलादेशातील ऑक्सिजन प्लांटला आग, पाच जणांचा मृत्यू; सुमारे 30 जण जखमी
बांगलादेशातील चट्टोग्राम जिल्ह्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील ऑक्सिजन प्लांटला शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत.
सीताकुंडा उपजिल्ह्यातील केशबपूर भागात सायंकाळी 4.30 च्या सुमारास ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर आगीच्या ज्वाला वाढत असल्याचे लोकांनी पाहिले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या बोलवाव्या लागल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Edited By - Priya Dixit