26 वर्षीय तरुणाची 800 वर्षांची गर्लफ्रेंड, बॅगेत घेऊन फिरत होता
तुम्हाला आश्चर्य वाटतं असेल पण असाच काहीसा प्रकार पेरूमध्ये घडला आहे. येथे 26 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून 800 वर्षे जुनी ममी सापडली आहे. ममी बघून पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती स्प्रीचुअल गर्लफ्रेंड म्हणजे आध्यात्मिक प्रेयसी आहे. सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पेरु पोलिसांनी मंगळवारी 26 वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजोला ताब्यात घेतले. ज्युलिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे 600 ते 800 वर्षे जुनी ममी (मानवी सांगाडा) जप्त केला. ममी त्याच पिशवीत होती ज्यात ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवत असे.
पोलिसांच्या चौकशीत त्याने आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणली होती. फूड डिलिव्हरी बॉयने त्याचे नाव 'जुआनिता' ठेवले. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुनीता माझ्या खोलीत माझ्यासोबत राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी आध्यात्मिक प्रेयसी आहे. तो त्याच्या मित्रांना दाखवणार होता.
सरकारला काय म्हणायचे आहे?
या मुद्द्यावर पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. प्री-हिस्पॅनिक अवशेष 'ममीफाईड प्रौढ पुरुष' होते. जो बहुधा पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील असावा. हे ठिकाण लिमाच्या आग्नेयेस सुमारे 1,300 किलोमीटर (800 मैलांपेक्षा जास्त) आहे.
मंत्रालयातील एका तज्ज्ञाने सांगितले, 'ही ममी जुआनिता नसून ती जुआन आहे. हा सांगाडा असलेल्या व्यक्तीचे वय किमान 45 वर्षे होते. ते पट्टीने गुंडाळलेले होते. सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की, ममी केलेले अवशेष संरक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने ताब्यात घेण्यात आले आहेत.