बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:20 IST)

लढाईची परिस्थिती? तैवानच्या लष्कराने पहिल्यांदाच चिनी ड्रोनवर गोळीबार करत इशारा दिला

Taiwan's military fired at Chinese drones and issued a warning
तैवानच्या लष्कराने मंगळवारी चिनी ड्रोनवर गोळीबार केला.तैवानच्या लष्करी प्रवक्त्याचे म्हणणे आहे की हे चेतावणीचे शॉट्स होते.त्यामुळे चीन आणि तैवानमधील तणावाची पातळी आणखी वाढणार आहे.तैवानच्या लष्कराने असे आक्रमक पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे.लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन तैवानच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका बेटावर चीनच्या सीमेजवळ उड्डाण करत होते.तैवानच्या लष्कराच्या गोळीबारानंतर ड्रोन चीनच्या दिशेने मागे वळल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यापासून परिस्थिती तणावपूर्ण आहे.पेलोसीच्या भेटीच्या वेळी, चिनी विमाने तैवानच्या आकाशातून उडू लागली.त्याचवेळी चीनने अमेरिकेला परिणाम भोगण्याची धमकीही दिली आहे.नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर अमेरिकेच्या खासदारांच्या पथकानेही तैवानला भेट दिली.यानंतर चीनचा संताप आणखीनच भडकला.त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.