1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:11 IST)

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन, जगभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Former Soviet Union leader Mikhail Gorbachev has passed away. He was 91 years old Marathi International News
सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
 
1985 मध्ये त्यांनी रशियाची सुत्रं स्वीकारली आणि USSR ला जगासमोर आणलं आणि मायदेशी अनेक महत्त्वाचे बदल घडवले.
 
मात्र सोव्हिएत युनियनची पडझड ते रोखू शकले नाहीत. त्यातूनच रशियाचा जन्म झाला होता.
 
गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगातून श्रद्धांजलीचा ओघ सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुखे आँटोन गट्रेस यांनी सांगितलं म्हणाले की इतिहास बदलण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
 
"गोर्बाचेव्ह एकमेवाद्वितीय नेते होते. जगाने एक मोठा नेता, शांततेचा पुरस्कर्ता गमावला आहे." असं त्यांनी ट्विटरवर लिहिलेल्या श्रद्धांजली संदेशात म्हटलं आहे.
 
ते दीर्घकाळ आजारी होते. गेल्या काही वर्षांत त्यांची तब्येत ढासळली होती. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
 
जून महिन्याच्या सुमारास ते किडनीच्या विकाराने आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली होती. तरीही त्यांच्या मृत्यूचं कारण जाहीर केलेलं नाही.
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली असं त्यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितलं आहे. रॉयटर्स ने ही माहिती दिली आहे.
 
युरोपियन महासंघाचे अध्यक्ष उर्सुला वोन देर लेयन म्हणाल्या की ते अत्यंत विश्वासार्ह आणि आदरणीय नेते होते. त्यांनी युरोप खुला करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचं कार्य चिरंतन स्मरणात राहील.
 
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की गोर्बाचेव्ह यांच्या धैर्याचा आणि प्रामाणिकपणाचा त्यांना आदर आहे. "सध्या पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी सोव्हित संघाला जगासमोर आणलं एक आगळं उदाहरण आहे." असं ते म्हणाले.
 
गोर्बाचेव्ह वयाच्या 54 व्या वर्षी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सचिव आणि देशाचे नेते झाले. त्यावेळी पॉलिट ब्युरो मध्ये असलेले ते सर्वात तरुण सदस्य होते. अनेक वयोवृद्ध नेत्यानंतर त्यांच्याकडे एक उदयोन्मुख नेता म्हणून बघितलं जात असेल. त्यांचे पूर्वसुरी कोन्स्टानिन चर्नेको यांचं 73 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी सूत्रं हातात घेतली होती.
 
त्यांनी देशात एक खुलेपणाची भावना रुजवली. त्यामुळे सामान्य जनतेला सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. आधीच्या काळात ते अशक्य होतं.
 
मात्र त्यामुळे देशाच्या अनेक भागात राष्ट्रवादाची भावना उफाळून आली आणि त्याची परिणती USSR कोसळण्यात झाली.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलायचं झाल्यास त्यांनी अमेरिकेबरोबर शस्त्रसंधी करार केला होता. जव्हा पूर्व युरोपातील देश कम्युनिस्ट नेत्यांच्याविरुद्ध उठून उभे राहिले तेव्हा त्यांनी मध्यस्थी करण्यास नकार दिला होता.
 
1991 मध्ये शीतयुद्ध समाप्त झालं. त्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शीतयुद्धाच्या दरम्यान रशिया आणि पाश्चिमात्य देशांच्या दरम्यान तणाव निर्माण झाला होता.

शांततेच्या कार्यासाठी त्यांना 1990 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.

1991 नंतर जो रशिया उदयाला आला त्यात त्यांनी शैक्षणिक कार्याकडे मानवी कल्याणाच्या प्रकल्पांकडे लक्ष दिलं.
1996 मध्ये त्यांनी राजकारणात येण्याचा क्षीण प्रयत्न केला. मात्र त्यांना 0.5% टक्के मत मिळाले.
त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीचा पाऊस पडला आहे. त्यांच्या कार्याची ओळख होण्यास ते पुरेसं आहे.