Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडोनेशियामध्ये 3 चर्चवर बॉम्बफेक ; 11 ठार

Updated: सोमवार, 14 मे 2018 (08:11 IST)
 
या बॉम्बस्फोटांपैकी पहिला हल्ला सुराबाया शहरातील सांता मारिया रोमन कॅथोलिक चर्चवर झाला. तेथील बॉम्बस्फोटामध्ये चौघेजण ठार झाले. यामध्ये एक हल्लेखोरही मारला गेला, असे पोलिस प्रवक्‍ते फ्रान्स बारुंग मान्गेरा यांनी वार्ताहरांना सांगितले. या स्फोटामध्ये एकूण 41 जण जखमी झाले. त्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर काही मिनिटातच दिपोनेगोरो चर्चवर आणि त्यानंतर पान्तेकोस्ता चर्चवरही अशाचप्रकारे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट किमान 5 हल्लेखोरांनी घडवले होते. त्यामध्ये बुरखाधारी एका महिलेचाही समावेश होता. या महिलेबरोबर दोन लहान मुलेही होती. तिला दिपोनेगोरो चर्चच्या बाहेर अडवण्यात आले होते. मात्र तिने आत घुसून एका व्यक्‍तीला मिठी मारली आणि बॉम्बचा स्फोट झाला, असे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
 
अध्यक्ष जोको विदोदो यांनी सुरबाया येथील घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची पहाणी केली. अल्पसंख्यांक ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्यासाठी झालेल्या या हल्ल्यांचा अध्यक्षांनी निषेध केला आहे. 2000 साली ख्रिसमसच्या रात्री अशाच प्रकारे चर्चवर झालेल्या हल्ल्यांमध्ये 15 जण मरण पावले होते. तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments