गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (16:45 IST)

शीख विद्यार्थ्याची हत्या

crime
परदेशात भारतीय मूळ असलेल्या नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. तर अमेरिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहेत. अशीच एका घटनेत एका अल्पवयीन युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
कॅलिफोर्नियात युवकाच्या घराच्या परिसरात भारतीय वंशाच्या एका १७ वर्षीय शीख विद्यार्थ्याची येथे हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.  हायस्कूलचा विद्यार्थी गुरनूर सिंह हा घरी परतत असताना त्याला गोळ्या मारण्यात आल्या आहेत. या मुलाचे काका  म्हणाले की, आमच्यासाठी हा फार मोठा आघात आहे. हे असे कसे होऊ शकते. आम्ही या प्रकारची  कल्पनाच करू शकत नाहीत. या युवकाच्या आजीने त्याचा मृतदेह  गॅरेजमध्ये पडलेला पाहिला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र फार उशीर झाला होता. तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर, मुसलमान, आफ्रिकन-अमेरिकन आणि लॅटिनोज यांच्या होत असलेल्या छळामुळे स्वत: ट्रम्प दु:खी झाले असून, हा छळ थांबवा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.