शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2017 (16:10 IST)

ट्रम्प यांचा सुधारित प्रवेशबंदी आदेशा न्यायालयाकडून रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुधारित प्रवेशबंदी आदेशालादेखील सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावले आहे. सहा देशांतील मुस्लिम नागरिकांना प्रवेशबंदीसाठी नवा नियम लागू करण्यात आला होता. हा नियम अमलात येण्याच्या काही तास अगोदरच रद्दबातल ठरला. हवाई येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डेरिक वॅट्सन यांनी बुधवारी हा निकाल दिला आहे. ट्रम्प यांचा सुधारित प्रवेशबंदी आदेश लागू करण्यासाठी परवानगी दिल्यास त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. त्यातून होणारी हानी कधीही भरून काढता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.