जगातील ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त
जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या यादीत ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात या देशांना पाणी विकत घेणे आणि खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे यांसारखे उपाय करावे लागतील. नाहीतर या ठिकाणच्या लोकांचे दैनंदिन जीवन आणखी कठिण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. देशातील लोकसंख्येच्या ५ टक्के लोक पाणी अव्वाच्या सव्वा किंमतीला खेरदी करतात किंवा आपल्या दैनंदिन गरजांसाठी अतिशय अस्वच्छ पाण्याचा वापर करतात.