सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:54 IST)

संविधान बचाव रॅली - संविधानाचा सन्मान हाच खरा देशाभिमान !

देशात समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित व्हावी, सर्वांना समान अधिकार मिळावा, यासाठी आपले संविधान महत्वाची भूमिका बजावते. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या या संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न काही अनिष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी  भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत 'संविधान बचाव रॅली' काढण्यात आली. धर्मनिरपेक्षतेची विचारधारा अवलंबणारे सर्वच बांधव एकत्र आले आणि संविधानाचा सन्मान करण्याचा निश्चय केला. या सर्व रॅलीसाठी खा. राजू शेट्टी आणि आ. जितेंद्र आव्हाड  यांनी पुढाकार घेतला होता.

या संविधान बचाव रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, जनता दल(यु)चे अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकपचे कॉ. सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमार अब्दुला, भाकपचे डी. राजा, भाजपचे बंडखोर नेते राम जेठमलानी, खा. प्रफुल्ल पटेल, डि. पी. त्रिपाठी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाई जगताप, नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते  जयंत पाटील  खा. माजिद मेनन, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. विद्या चव्हाण, उपस्थित होते.