शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (15:01 IST)

जपानमध्ये भूकंप, तीव्रता ६.१ रिश्टर स्केल

पश्चिमी जपानमधील मेट्रोपॉलिटन शहर असलेल्या ओकासामध्ये झालेल्या भूकंपामध्ये तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ४०हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओकासामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. तर जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसर भुकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. ओकासा शहरास लागून असलेल्या शहरांमध्येही भूकंपाचे हादरे जाणवले. 
 
खबरदारीचा उपाय म्हणून ओकासा शहरामधील रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. विमान सेवाही विस्कळीत झाली आहे. जवळपास पावणे दोन लाख घरांमधील वीजपुरवठा बंद पडला. पण प्रशासनाला तातडीने कार्यवाही करत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.