1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (15:56 IST)

निर्लेपला बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार

bajaj electricals
निर्लेप कंपनी आता बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कंपनीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षातच निर्लेप या मराठमोळ्या कंपनीची विक्री होणार आहे. निर्लेपने 1970 मध्ये भारतात स्वयंपाकाची भांडी नॉनस्टिक प्रकारात आणून क्रांती केली.
 
बजाज इलेक्ट्रिकल्स निर्लेपचे 80 टक्के शेअर्स 42.50 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचं कळतं. मात्र अद्याप कोणतीही रक्कम ठरली नसल्याचं निर्लेपचे सर्वेसर्वा राम भोगले यांनी सांगितलं. व्यवहारानुसार, निर्लेप 80 टक्के शेअर्स बजाज इलेक्ट्रिकल्सला विकणार असून 20 टक्के शेअर्स स्वत:कडे ठेवणार आहे. येत्या सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल. निर्लेप उद्योग समुहाचे शेअर मार्केटमधील शेअर्स सतत कोसळत आहेत. त्यामुळे तोटा वाढत असल्याने तसंच जागतिक बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राम भोगले यांनी सांगितलं.