आयफोन खरेदी केल्यानंतर
आयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. हा फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
* आयफोन विकत घेतल्यानंतर सर्वात आधी अॅपल आयडी तयार करा. अॅपल आयडी तयार केल्यानंतर तुम्ही एकाच वेळी बरीच कामं करू शकता.
* आय ट्यून्स कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर डाउनलोड करून घ्या. यामुळे फोन तुमच्या कॉम्प्युटरशी जोडला जातो. यामुळे तुमचा म्युझिक तसंच व्हिडिओ डाटाला सेव्ह राहतो.
* वरच्या दोन स्टेप्स फॉलो केल्यानंतर फोन अॅक्टिव्हेट करा. तुमचं डिव्हाइस सिंक्रोनाइज करा.
* फाइंड माय आयफोन हा ऑप्शन अॅक्टिव्हेट करून घ्या.
* आयक्लाउडमध्ये डेटा स्टोअर करता येईल.