सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (22:09 IST)

Elon Musk in Twitter: एलॉन मस्क ट्विटरच्या बोर्डात सामील

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर इंकमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे.त्यासाठी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये एलॉन मस्क यांचे कंपनीच्या संचालक मंडळात स्वागत केले.
 
अग्रवाल म्हणाले, त्यांचा आमच्या सेवेवर विश्वास आहे आणि ते गंभीर टीकाकार आहेत. लांब पल्‍ल्‍यासाठी स्‍वत:ला बळकट बनवण्‍यासाठी आम्‍हाला ट्विटर आणि बोर्ड रूममध्‍ये याचीच आवश्‍यकता आहे.
 
पराग अग्रवाल पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या बोर्डावर एलॉन मस्कची नियुक्ती करत आहोत ही माहिती सांगताना मला आनंद होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ट्विटद्वारे मस्क यांच्याशी झालेल्या संभाषणात हे स्पष्ट झाले आहे की ते आमच्या मंडळात नवीन मूल्य आणेल