शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (16:54 IST)

विमानात खिडकीत बसण्यावरून प्रवाशांमध्ये हाणामारी

आपण रेल्वे ने प्रवास करताना किंवा बसने प्रवास करताना खिडकीत बसण्यावरून भांडण होताना अनेकदा बघितले आहे. पण विमानात खिडकीवरून वाद होऊन हाणामारी केल्याची घटना प्रथमच समोर आली आहे.या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण ब्राझीलचे आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओ मध्ये विमानात खिडकीत बसण्यावरून दोन कुटुंबात वाद झाला नंतर हा वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. झाले असे की एक महिलेने आपल्या अपंग मुलासाठी विंडोसीट देण्याची विनवणी प्रवाशाला केली. त्याने आपली विंडोसीट देण्यास नकार दिला या वरून ती महिला संतापली आणि प्रवाशाला अपशब्द बोलू लागली. या वरून त्या प्रवाशाने देखील शिवीगाळ करायला सुरु केले, नंतर बाचाबाची हाणामारीवर झाली.

या वादाला शांत करण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी आपापल्यापरी प्रयत्न केले. तरीही दोन्ही कुटुंब समजून घेण्यासाठी तयार नव्हते. विमान टेक ऑफ करण्यासाठी दोन तास उशीर झाला. अखेर शेवटी दोन्ही कुटुंबियांना विमानातून खाली उतरवून विमान प्रवासासाठी निघालं. 
 
Edited By - Priya Dixit