गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (12:09 IST)

युरोप मध्ये महापूर,120 पेक्षा अधिक लोकं मृत्युमुखी झाले,तर 1300 हून अधिक बेपत्ता

Floods in Europe have killed more than 120 people and left more than 1
बर्लिन.पश्चिम जर्मनी आणि बेल्जियमच्या बर्‍याच भागात विनाशकारी पूरात 120 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. या भीषण महापूरात 1300 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.बेपत्ता किंवा धोक्यात सापडलेल्यांचा शोध आणि मदतकार्य सुरू आहे.
 
जर्मनीच्या रिनेलैंड-पलाटिनेट राज्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की तेथे 60 लोक मरण पावले आहेत, ज्यात 12 जणांचा समावेश सिंजिंग येथील अपंग निवारा येथे राहणाऱ्यांच्या आहे. शेजारच्या उत्तर रिने -वेस्टफेलिया राज्यातील अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या 43 वर गेली आणि मृतांचा आकडा वाढू शकतो असा इशारा दिला.
 
जर्मन राष्ट्राध्यक्ष फ्रँक-वॉल्टर स्टीनमेयर म्हणाले की, पुरामुळे होणाऱ्या विध्वंस बघून त्यांना धक्का बसला आहे आणि  या मध्ये ठार झालेल्या लोकांच्या  कुटुंबियांना आणि आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शहर व खेडेगावांना मदत करण्याचे आवाहन केले.स्टीनमेयर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'या कठीण काळात आपला देश एकत्र उभा आहे. ज्या लोकांकडून पूर त्यांच्यापासून सर्व काही काढून घेत आहे त्यांच्याशी आपण एकता दर्शविली पाहिजे हे महत्वाचे आहे.
 
शुक्रवारी, कोलोग्नेच्या दक्षिण-पाश्चिमात असलेल्या एफ्ट्सडट  शहरात घरांच्या आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकर्ते प्रयत्न करीत होते. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, घराच्या खाली असलेली जमीन अचानक ढासळल्यामुळे घर खाली कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला.
 
काउंटीप्रशासनचे प्रमुख फ्रँक रॉक म्हणाले की काल रात्री आम्हाला 50 लोकांना घरातून बाहेर काढण्यात यश आले.अद्याप ज्यांना वाचवणे आवश्यक आहे अशा 15 लोकांविषयी माहिती आहे.
 
जर्मन प्रसारक एन-टीव्हीशी बोलताना रॉक म्हणाले की किती लोकांचा मृत्यू झाला याचा अधिकाऱ्यांकडे अद्याप अचूक आकडा नाही.ते म्हणाले की या परिस्थितीत काही लोक वाचू शकले नाही .
 
जर्मनीमध्ये अजूनही सुमारे 1300लोक बेपत्ता आहेत.या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.जर्मनीत 100 लोकांचा बळी गेल्यानंतर बेल्जियम मध्ये मृतांचा आकडा सर्वाधिक आहे.
 
बेल्जियमचे गृहराज्यमंत्री अन्नेलियेस विरलिंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात मृत्यूची संख्या 18 वर पोचली आहे, तर 19 लोक बेपत्ता असल्याचे समजत आहे.