शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (10:15 IST)

चांगली बातमी ! मलेरिया लसीला WHO ची मान्यता, या धोकादायक आजाराची लक्षणे जाणून घ्या

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी मुलांसाठी जगातील पहिली मलेरिया लस RTS, S/AS01 वापरण्याची शिफारस केली आहे. संस्थेने ह्याला विज्ञान, बाल आरोग्य आणि मलेरिया नियंत्रणासाठी एक यश म्हणून सांगितले आहे. मलेरियामुळे दर दोन मिनिटांनी जगात एका मुलाचा मृत्यू होतो.
 
 मलेरियाच्या लसीची शिफारस घाना, केनिया आणि मलावी येथे सुरू असलेल्या पायलट कार्यक्रमाच्या परिणामांवर आधारित आहे . त्याची सुरुवात 2019 साली झाली.
 
WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम म्हणाले की, मलेरिया रोखण्यासाठी सध्याच्या उपाययोजनांसह या लसीचा वापर केल्यास दरवर्षी हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात. ते म्हणाले की हे एक शक्तिशाली नवीन शस्त्र आहे, परंतु कोविड -19 लसीप्रमाणे हा एकमेव उपाय नाही. मलेरिया विरूद्ध लस डासांच्या जाळ्या किंवा तापाची काळजी यासारख्या उपायांची जागी नाही किंवा त्यांची गरज कमी करत नाही.
 
मलेरियाची लक्षणे
- शरीरात वेदना होते 
- थंडी वाजून ताप येतो 
-उलट्या होणे
- डोकेदुखी
 
मलेरिया रोखण्याचे उपाय -
* शक्यतो घरात डास नसावेत, स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या.
* घराबाहेरअसलेल्या उघड्या नाल्यांची स्वच्छता करत राहा.
* कीटकनाशकांची फवारणी करत रहा.
* घरात कुठेही ओलावा किंवा पाणी साठू नये.
* जर घरात जास्त डास असतील, तर घरात गवऱ्यांचा धूर करा.असं केल्याने डास पळून जातात.