आर्थिक वाद असूनही, जपानची राजकुमारी सामान्य माणसाशी लग्न करेल
जपानमधील शाही राजवाड्याने शुक्रवारी जाहीर केले की राजकुमारीच्या भावी सासूच्या आर्थिक वादामुळे त्यांच्या लग्नाला लोकांचा पूर्ण पाठिंबा नाही. नवविवाहित जोडपे 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील आणि एकत्र पत्रकार परिषद घेतील.
जपानची राजकुमारी माको आणि तिचा प्रियकर पुढील महिन्यात वैवाहिक बंधनात अडकणार आहेत, परंतु आत्तापर्यंत लग्न समारंभाची कोणतीही योजना नाही. रॉयल पॅलेसने शुक्रवारी जाहीर केले की राजकुमारीच्या भावी सासूच्या आर्थिक वादामुळे त्यांच्या लग्नाला लोकांचा पूर्ण पणे पाठिंबा नाही. माको कोणत्याही राजपुत्राशी नाही तर एका सामान्य माणसाशी लग्न करत आहे.
माकोच्या होणाऱ्या वराचा केई कोमुरोच्या आईशी संबंधित वाद राजघराण्यासाठी खूपच लाजिरवाणा मानला आहे आणि लोकांच्या पाठिंबा मिळत नसल्यामुळे त्यांचे लग्न तीन वर्षांहून अधिक लांबले आहे. 29 वर्षीय कोमुरो गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमधून जपानला परतले, जिथे ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते .
इम्पीरियल हाऊसहोल्ड एजन्सीने म्हटले आहे की, नवविवाहित जोडपे 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील आणि एकत्र पत्रकार परिषद घेतील. या वर्षाच्या अखेरीस ते न्यूयॉर्कमध्ये एकत्र नवीन वैवाहिक जीवन सुरू करतील अशी अपेक्षा आहे. एजन्सीने सांगितले की जोडप्यांसाठी लग्नाची मेजवानी आणि इतर विधी होणार नाहीत कारण बरेच लोक लग्न समारंभ साजरा करणार नाहीत.
राजवाडा अधिकाऱ्यांनी सांगितले की माको ने कोमुरोच्या प्रेमाखातिर सुमारे 150 दशलक्ष येन ($ 135 दशलक्ष)वर पाणी सोडले आहे. अशा प्रकारे माकोने या लग्नासाठी राजघराणे सोडले आहे. सामान्य माणसाशी लग्न करण्यासाठी शाही संपत्ती सोडून देणाऱ्या माको दुसऱ्या महायुद्धानंतर राजघराण्याची पहिली महिला सदस्य असतील.
माको आणि कोमुरो हे टोकियोमधील आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठात वर्गमित्र होते. त्यांनी 2017 मध्ये जाहीर केले होते की ते पुढील वर्षी लग्न करणार आहेत, परंतु आर्थिक वादांमुळे हे लग्न दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आले. कॉमूरो 2018 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले जिथून ते आता पहिल्यांदा परतले आहे.