गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:41 IST)

20 कोटी लॉटरीचा भारतीय विजेता गायब, दोन्ही फोन नंबरवर संपर्क होत नाहीये

20 कोटी लॉटरी लागल्यावर वेड लागण्याची वेळ येईल. परंतु इतकं लकी असून आपल्यापर्यंत ही बाब पोहचली नाही तर... असं काही घडतं आहे युएईमध्ये एका भारतीय नागरिकासोबत. त्याला कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही. 
 
अनेक दिवसांपासून त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु तो नेमका कुठे गेलाय हेच माहित पडत नाहीये. अनेकजण त्याचा शोध घेत आहेत. या व्यक्तीचा फोनच लागत नाहीये आणि त्या व्यक्तीकडूनही कुणाला फोन देखील येत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पहिल्या नंबरवर कॉल केल्यानंतर नंबर संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची सूचना येत आहे तर एकदा इंग्रजीतून आणि एकदा मल्याळी भाषेतून ही सूचना ऐकवली जाते. तर दुसरा नंबर आऊट ऑफ रिच सांगत आहे. हे दोन्ही नंबर लागत नसल्याने नहील यांना संपर्क तरी कसा साधायचा, असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे.
 
येथे रविवारी या लकी ड्रॉ चं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या ठरलेल्या लकी ड्रॉचा नंबर होता 278109. लॉटरी जिंकणारा केरळचा मूळ रहिवासी आहे. नहील नावाच्या या व्यक्तीचे दोन्ही मोबाईल नंबर सध्या बंद असून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
 
ही लॉटरी दुसऱ्या क्रमांकाने जिंकणारी व्यक्तीदेखील भारतीय आहे. सौदी अरेबियात राहणारे भारतीय प्रवासी अँजेलो फर्नांडिस यांनी लॉटरी जिंकली असून त्यांनी 25 सप्टेंबरला खरेदी केलेल्या तिकीटाचा नंबर 000176 होता.