1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:50 IST)

ऑस्ट्रेलिया : गणपती बाप्पाचे जाहिरातीत आक्षेपार्ह चित्रण

india-opposes-advertisement-ganesha-eating-meat-action-demand

ऑस्ट्रेलियात एका जाहिरातीत गणपतीला मांसाहार करताना दाखविण्यात आलं होतं. भारतीय दूतावासाने या आक्षेपार्ह जाहिरातीला विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा परराष्ट्र विभाग, कम्युनिकेशन्स आणि कृषी विभागाला कॅनबेराच्या भारतीय उच्चायुक्तालयाने पत्र पाठवलं आहे. 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ची ही जाहिरात भारतीयांच्या भावना दुखावणारी असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने या जाहिरातीला तीव्र विरोध केला आहे. मांस उत्पादक समूह 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ची ही जाहिरात आहे.  या जाहिरातीत गणपतीला इतर धर्मांच्या प्रतिनिधींसह कोकराचं मांस खाताना दाखवण्यात आलं आहे. गणेशाला कधीही मांसाचा नैवैद्य दाखवला जात नाही. परिणामी ही वादग्रस्त जाहिरात मागे घेतली जावी, अशी मागणी भारतीय उच्चायुक्तालयाने केली आहे.