शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (15:22 IST)

रशियान तेलाच्या माध्यमातून भारताची पाकिस्तानला अप्रत्यक्ष मदत?

imran khan putin
आता पाकिस्तान आणि रशियामध्ये एक लाख मेट्रिक टन तेल खरेदीचा करार झाल्यानं पाकिस्तानला रशियाकडून तेल मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
 
या दोन्ही देशांनी तेल खरेदी कराराला दुजोरा दिलाय. हे तेल स्वस्त दरात मिळत असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय, तर रशियाने मात्र आम्ही अशी कोणतीही विशेष सवलत दिली नसल्याचं म्हटलंय.
 
पाकिस्तानने या तेलासाठी चिनी चलनात पैसे दिलेत.
 
गेल्या महिन्यात पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तानला रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळतंय.
 
रशियन तेल पाकिस्तानात पोहोचल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता आपले दिवस बदलल्याचं म्हटलं होतं.
 
शाहबाज शरीफ म्हणाले होते, "मी देशाला दिलेलं आणखीन एक वचन पूर्ण केलंय. सवलतीच्या दरात मिळालेलं रशियन कच्चं तेल कराचीत पोहोचलंय. आता आपले दिवस बदलले आहेत. आपण समृद्धी, आर्थिक प्रगती आणि ऊर्जा सुरक्षिततेकडे आणखीन एक पाऊल टाकलंय."
 
पण अनेक माध्यमांनी असा दावा केलाय की, पाकिस्तानला मिळालेल रशियन तेल भारतात शुद्ध करून संयुक्त अरब अमिरातीमार्गे पाकिस्तानात पोहोचवलं जातंय.
 
तेलाची पहिली खेप केव्हा आली?
तेलाची पहिली खेप 11 जूनला रशियाच्या एका मालवाहू जहाजातून पाकिस्तानात पोहोचली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आपल्यालाही स्वस्त दरात रशियन तेल मिळावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू होते.
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान रशियन तेलाच्या खरेदीबाबत कायम भारताचं उदाहरण द्यायचे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर भारताने रशियाकडून तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली.
 
पाकिस्तानने या वर्षी एप्रिलमध्ये रशियासोबत एक लाख मेट्रिक टन तेलाचा करार केला होता.
 
'दोस्ती जिंदाबाद'
पाकिस्तानने रशियन तेलाची खरेदी करण्याला विविध दृष्टीकोनांमधून पाहिलं जातंय. असं म्हटलं जातंय की, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर भारत आणि रशियाच्या संबंधांमध्ये अनेक अडथळे निर्माण झालेत. याच दरम्यान रशिया आणि पाकिस्तानमधील सहकार्य मात्र वाढत चाललंय.
 
सोबतच ग्लोबल साउथचे देश पाश्चिमात्य देश आणि रशियासोबतच्या संबंधांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जातंय.
 
तसं पाहायला गेलं तर शीतयुद्धाच्या काळापासूनच रशिया आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या गोटात सामील होता.
 
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाची घोषणा करताच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोला पोहोचले होते.
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान रशियन तेलाच्या खरेदीबाबत कायम भारताचं उदाहरण द्यायचे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर भारताने रशियाकडून तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली.
 
पाकिस्तानने या वर्षी एप्रिलमध्ये रशियासोबत एक लाख मेट्रिक टन तेलाचा करार केला होता.
 
'दोस्ती जिंदाबाद'
पाकिस्तानने रशियन तेलाची खरेदी करण्याला विविध दृष्टीकोनांमधून पाहिलं जातंय. असं म्हटलं जातंय की, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर भारत आणि रशियाच्या संबंधांमध्ये अनेक अडथळे निर्माण झालेत. याच दरम्यान रशिया आणि पाकिस्तानमधील सहकार्य मात्र वाढत चाललंय.
 
सोबतच ग्लोबल साउथचे देश पाश्चिमात्य देश आणि रशियासोबतच्या संबंधांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जातंय.
 
तसं पाहायला गेलं तर शीतयुद्धाच्या काळापासूनच रशिया आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या गोटात सामील होता.
 
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाची घोषणा करताच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोला पोहोचले होते.
 
पाकिस्तान समोरील आव्हानं
रशिया आणि पाकिस्तानमधील सहकार्याला देखील विविध आयाम आहेत. पण असं असलं तरी पाकिस्तान जास्त काळासाठी रशियाकडून तेलाची खरेदी करणं शक्य नाही, कारण पाकिस्तानकडे तेल शुद्धीकरण यंत्रणा नाहीये. पाकिस्तान स्वतः आर्थिक संकटात सापडलाय.
 
पाकिस्तानला रशिया सोबतचे संबंध इतक्याही पुढे न्यायचे नाहीयेत की जेणेकरून अमेरिका नाराज होईल. जागतिक वित्तीय संस्थांवर अमेरिकेचे वर्चस्व आहे आणि पाकिस्तानला कर्ज घेण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची गरज आहे.
 
जी 7 ने ठरवून दिलेल्या तेलाच्या किंमती विरोधात जाण्याचं धाडस पाकिस्तान क्वचितच करेल.
 
युक्रेन-रशिया युद्धात आपण तटस्थ आहोत हे दाखविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पण अशा अनेक बातम्या आल्यात ज्यात असं म्हटलंय की, पाकिस्तानने युक्रेनला शस्त्र पाठवली होती.
 
तेल खरेदीवर रशियाने कोणतीही सवलत दिली नसल्याचं म्हटलंय...
रशियाचे ऊर्जा मंत्री निकोलय शुल्गिनोव्ह यांचं एक वक्तव्य सध्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेत आहे.
 
पाकिस्तानचं प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिलंय की, पाकिस्तानने रशियाच्या तेलाचे पैसे युआनमध्ये भागवले.
 
रशियाचे ऊर्जा मंत्री निकोलय शुल्गिनोव्ह यांनीही म्हटलंय की, मित्र देशाच्या चलनात पैसे मिळाल्यानंतर पाकिस्तानला तेलाची निर्यात सुरू केली आहे.
 
रशियन आणि अमेरिकन माध्यमांच्या बातम्यांनुसार, रशियाने तेल खरेदीत पाकिस्तानला कोणतीही विशेष सवलत दिली नसल्याचं रशियाच्या ऊर्जामंत्र्यांनी म्हटलंय.
 
मागील आठवड्यात सेंट पीटर्सबर्ग येथे इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम (एसपीआयईएफ) दरम्यान पत्रकारांशी बोलताना शुल्गिनोव्ह म्हणाले होते की, पाकिस्तानला जास्तीत जास्त तेलाची निर्यात करण्यासाठी रशिया आग्रही आहे. यावेळी त्यांनी रशियन तेलाच्या निर्यातीवर लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.
 
शुल्गिनोव्ह यांनी पुढे असंही म्हटलंय की, "पाकिस्तान देखील भारताइतकाच महत्त्वाचा मित्र आहे."
 
शुल्गिनोव्ह म्हणाले की, "पाकिस्तानला तेलाची निर्यात सुरू झाली असली तर त्यांना कोणती विशेष सवलत दिलेली नाही. इतर खरेदीदारांना ज्या दराने तेल विकलं जातंय, त्याच दरात पाकिस्तानलाही तेल दिलं जातंय. आत्ता एका जहाजाची निर्यात झाली आहे, भविष्यात आणखीन तेल निर्यात केलं जाईल."
 
मागच्या महिन्यात शुल्गिनोव्ह म्हणाले होते की, रशिया आपल्या तेलाची निर्यात मर्यादित करण्याचा विचार करत असून, गरज पडल्यास तसा प्रस्ताव आणला जाईल. मात्र, रशियाच्या रशा 24 या वृत्तवाहिनीशी बोलताना तेलाच्या निर्यातीवर निर्बंध येण्याच्या शक्यतेकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं होतं.
 
शुल्गिनोव्ह म्हणाले होते की, "घाऊक बाजारात तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आम्ही निर्यात मर्यादित करण्यावर चर्चा केली. त्याचबरोबर किरकोळ बाजारावर असलेल्या दबावावरही चर्चा झाली. मात्र आपली निर्यात बाजारावर अवलंबून आहे."
 
भारतातील शुद्ध तेल यूएई मार्गे पाकिस्तानात ?
भारतीय माध्यमांतील वृत्तानुसार, जे तेल पाकिस्तानला निर्यात केलं जातंय ते भारताच्या गुजरातमधील रिफायनऱ्यांमध्ये शुद्ध करण्यात आलंय.
 
इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, मागच्या रविवारी कराचीत पोहोचलेलं रशियन तेल गुजरातमधील भारतीय रिफायनरीमध्ये शुद्ध करण्यात आलंय. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पाहता ते संयुक्त अरब अमिरातीमार्गे पाकिस्तानला पाठवण्यात आलं आहे.
 
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार बंद आहे.
 
असं म्हटलं जातंय की, पाकिस्तानला तेलाची निर्यात केल्यामुळे भारत रशियावर नाराज होऊ नये यासाठी रशियाने संयुक्त अरब अमिरातीच्या माध्यमातून तेल पाठवलं आहे.
 
शिपिंग गुंतवणूकदार आणि विश्लेषक एड फिनले रिचर्डसन यांनी ट्विटरवर एक नकाशा शेअर केलाय. यात रशियाने पाकिस्तानला पाठवलेल्या तेलाचा मार्ग आहे.
 
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, रशियाने पाकिस्तानला तेल कसं पाठवलं - तर रशियन तेल भारतात आलं, त्यानंतर भारतातून ते संयुक्त अरब अमिराती आणि नंतर पाकिस्तानात पोहोचलं.
 
पाकिस्तानमध्ये थेट भारतातून पाठवलेला माल स्वीकारला जात नाही. त्यामुळे हे रशियन तेल संयुक्त अरब अमिरातीमार्गे पाठवण्यात आलंय.
 
ज्या जहाजातून हे तेल पाकिस्तानात पोहोचलं ते संयुक्त अरब अमिराती मधील एका नोंदणीकृत कंपनीचं आहे.
 
या मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रिचर्डसन लिहितात, "हा मार्ग तुम्हाला योग्य वाटतोय का? तुम्हाला वाटतं का, हा मार्ग निवडून रशिया खूश असेल? यामुळे तेलाच्या किमतींवरील दबाव वाढेल की कमी होईल?"
 
याबाबत अधिक माहिती देताना रिचर्डसन यांनी लिहिलंय की, "असा अंदाज लावला जातोय की, पहिल्यांदा हे तेल इराणमध्ये आलं, नंतर ओमानमधून भारतात आलं. भारतात हे तेल शुद्ध करून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचवलं गेलं आणि तिथून पुढे पाकिस्तानात पाठवण्यात आलं."
 
पाकिस्तानने रशियाकडून एक लाख टन तेल खरेदी करण्याचा करार केलाय. 45 हजार टन तेल पाकिस्तानात पोहोचलं असून 55 हजार टन अजूनही वाटेतच आहे.
 
या सगळ्यावर उपस्थित होणारे प्रश्न
पाकिस्तानी पत्रकार वकास यांनी या तेल करारावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलंय की, 'भारत आणि संयुक्त अरब अमिराती मध्यस्थी करून यात फायदा घेत आहेत.
 
वकास यांनी पुढे म्हटलंय की, "रशियाने भारताला 52 डॉलर प्रति बॅरल दराने तेल विकलंय. त्यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील एकाने हे तेल याच किंमतीत खरेदी केलं आणि पाकिस्तानला 69 डॉलर या दराने विकलं. यात भारतीय खरेदीदाराने एका बॅरलमागे किमान 17 डॉलर कमावले."
 
वकास लिहितात, "या करारात पाकिस्तानला फक्त लॉलीपॉप मिळालं. निवडणुकीपूर्वी तेलाच्या किंमती कमी करण्याचं हे एक निमित्त ठरू शकतं."
 
त्याचवेळी पाकिस्तानातील जनताही या कराराच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पाकिस्तान तेहरीक-ए इन्साफ (पीटीआय) या विरोधी पक्षाशी संबंधित हमद चौधरी यांनी ट्वीट करत म्हटलंय की,
 
पाकिस्तानने मागच्या वर्षी एप्रिलमध्येच जर रशियाकडून तेल विकत घेतलं असतं तर त्याचा फायदा पाकिस्तानला झाला असता. कारण त्यावेळचे दर कमी होते आणि सवलत खूप जास्त होती. यामुळे पाकिस्तानचं परकीय चलन वाचवता आलं असतं.
 
पाकिस्तानच्या तत्कालीन इम्रान खान सरकारने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता.
 
रशिया - पाकिस्तानचा फायदा?
हा तेल करार रशिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी फायदेशीर मानला जातोय.
 
अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियाच्या तेल निर्यातीवर निर्बंध लादलेत. त्यामुळे रशिया आपल्या तेलासाठी नव्या बाजारपेठेच्या शोधात आहे.
 
अशात पाकिस्तानची बाजारपेठ रशियन तेलासाठी मोठी बाजारपेठ ठरू शकते.
 
दुसरीकडे पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अशात रशियाचं तेल देखील पाकिस्तानसाठी नवी संधी ठरण्याची शक्यता आहे.
 
पाकिस्तान आपल्या उर्जेच्या गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे आणि त्याच्या परकीय चलनाचा सर्वांत मोठा भाग तेल खरेदीवर खर्च केला जातो.
 
अशा परिस्थितीत जर रशियन तेल विकत घेतलं तर परकीय चलनाची बचत होईल आणि पाकिस्तानला थोडा दिलासा मिळेल. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 6.5 अब्ज डॉलरचं बेलआउट पॅकेज मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Published By -Smita Joshi