जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी डोंगर आगुंगमध्ये पुन्हा उद्रेक होत आहे. इंडोनेशियातील बाली येथे असलेल्या या डोंगरावर 3.4 किमी उंच राखेचे वादळ आग ओकत आहे. कुठल्याही क्षणी यातून लावारस बाहेर येऊ शकतो असा हायअलर्ट प्रशासनाने जारी केला. यासोबतच 7500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बाली विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एकूणच 445 विमान रद्द झाले असून त्याचा फटका 59000 पर्यटक आणि प्रवाश्यांना बसला आहे.
माउंट आगुंगच्या परिसरातील प्रत्येक गोष्ट राखेने माखली आहे. येथील रस्ते, झाड, घरे आणि झाडांच्या पानांवर सुद्धा धूळ आणि राख आहे.