गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 जून 2025 (11:10 IST)

इस्रायलचा गाझावर मोठा हल्ला 34 पॅलेस्टिनी ठार

Israel Hamas War
रविवारी सकाळी इस्रायली सैन्याने गाझावर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान 34 पॅलेस्टिनी ठार झाल्याचे वृत्त आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने केलेला हा एक अतिशय प्राणघातक हल्ला होता. स्थानिक रुग्णालयाने या मृत्यूची पुष्टी केली आहे.
हल्ल्यादरम्यान इस्रायली सैन्याने गाझामधून एका थाई ओलिसाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आयडीएफने सांगितले की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. या काळात हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये1200 लोकांची हत्या केली. इतकेच नाही तर हमासने 238इस्रायली नागरिक आणि काही परदेशी लोकांचे अपहरण केले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्य गाझावर सतत हल्ले करत आहे.
19 जानेवारी 2025 रोजी कतारच्या मध्यस्थीने गाझा आणि हमास यांच्यात युद्धबंदी झाली. परंतु त्यानंतर हमासने काही ओलिसांना सोडण्यासाठी आपल्या अटी ठेवल्या आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत ओलिसांना सोडले नाही. यामुळे इस्रायली सैन्याने पुन्हा गाझामध्ये जमिनीवर कारवाई सुरू केली. आता इस्रायली सैन्याने गाझाच्या अनेक भागांवर पूर्ण ताबा मिळवला आहे.
Edited By - Priya Dixit