बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (13:32 IST)

जपान ने इंटरनेटस्पीडचे नवीन जागतिक विक्रम नोंदविले,प्रति सेकंद 319 टेराबाईटच्या वेगाने डेटा ट्रान्सफर केले

जपानने इंटरनेट वेगाच्या बाबतीत एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. त्याने प्रति सेकंद 319 टेराबाईटच्या वेगाने डेटा हस्तांतरित करून ही कामगिरी केली आहे.जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या पथकाने ऍडव्हान्स फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानाचा वापर केला.त्यांनी ही वेग चाचणी 0.125 मिमी व्यासाचा 4-कोर ऑप्टिकल फायबरचा वापर करून केली.यापूर्वी, इंटरनेट गतीचा विक्रम प्रति सेकंद 178 टेराबाइट होता, जो एका वर्षापूर्वी जपान आणि ब्रिटनच्या अभियंत्यांनी बनवला होता. 
 
हा विक्रम करण्यासाठी, संशोधकांनी दोन विशेष प्रकारच्या फायबर एम्पलीफायरचा वापर करून ट्रान्समिशन लूप तयार केला. एर्बियम आणि थुलियम फायबर एम्प्लीफायर्स आणि रमन एम्पलिफिकेशनने 3,001 किमी लांबीचे ट्रान्समिशन सक्षम केले.जपानी संशोधन संस्थेने या महिन्याच्या सुरूवातीला प्रसिद्ध केलेल्या एका पेपरमध्ये या संशोधनाचे अनेक मार्गांनी वर्णन केले आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या मते,नवीन डाटा सर्व्हिसेसची वेगाने वाढती मागणी असतानाही गतीची ही कामगिरी आवश्यक होती. अद्ययावत इंटरनेट स्पीड टेस्ट संवादाच्या नवीन माध्यमांसाठी खूप उपयुक्त ठरेल असेही संशोधन संस्थेने म्हटले आहे. तसेच प्रसारित होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढील काम केले जाईल,असेही सांगण्यात आले.