भारताच्या संजलने तयार केले आहे ते रॉकेट ज्यामध्ये जेफ बेझोस अवकाशात उड्डाण करतील
मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अंतराळ यानाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत तिचा सहभाग झाला आहे.
अमेरिकेतल्या शिकागो आणि कॅलिफोर्निया येथे तिने एरोस्पेस या विषयात उच्च शिक्षण प्राप्त केले. येत्या मंगळवारी या यानाची उडानपूर्व प्राथमिक चाचणी घेतली जाणार आहे. शर्यतीच्या गाड्यांचे इंजिनचे डिझाईन करण्यात संजलने प्राविण्य प्राप्त केल्यानंतर न्यू शेपर्ड यानाची निर्मिती करणाऱ्या चमूत तिला स्थान मिळाले. संजलने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-बाबांनी दिली.