मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (09:44 IST)

काबूल स्फोटात 13 अमेरिकन सैनिक ठार, जो बायडन चे दहशतवाद्यांना आव्हान - विसरणार नाही, माफ करणार नाही,सोडणार नाही

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या मालिकेतील बॉम्बस्फोटांमध्ये अमेरिकेचे 13 सैनिक ठार झाले. 11 अमेरिकन मरीन सैनिक आणि एक नौदलाचे वैद्यकीय कर्मचारी काबूल विमानतळावरील हृदयद्रावक स्फोटांमध्ये सामील होते.या बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत एकूण 72 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तथापि, या स्फोटांनंतरही अमेरिका आपले स्थलांतरण ऑपरेशन थांबवणार नाही. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांचे निर्वासन सुरूच राहील असे जाहीर केले आहे. 
 
काबूल बॉम्बस्फोटानंतर दहशतवाद्यांना खुले आव्हान देताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, 'आम्ही माफ करणार नाही. आम्ही विसरणार नाही. आम्ही सोडणार नाही आणि तालिबान ला याचा परिणामांना सामोरे जावे लागेल. ते पुढे म्हणाले की, काबूल विमानतळावरील हल्ल्यांमध्ये तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांच्यातील सहभागाचे अद्याप कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ते म्हणाले की आम्ही अमेरिकन नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका करू. आम्ही आमच्या अफगाण मित्रांना बाहेर काढू आणि आमचे ध्येय पुढे चालू राहील.
 
येथे, दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की 60 पेक्षा जास्त अमेरिकन लष्करी जवान जखमी झाले आहेत आणि त्यांची संख्या वाढू शकते. तर, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन आत्मघाती हल्लेखोर आणि बंदूकधाऱ्यांनी विमानतळाजवळ जमावाला लक्ष्य करून हल्ले केले,या मध्ये किमान 13 लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले.तथापि, रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीत अमेरिकी मरीनची संख्या समाविष्ट आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही.
 
अफगाणिस्तानमध्ये रुग्णालये चालवणाऱ्या एका इटालियन संस्थेने सांगितले की ते विमानतळावरील हल्ल्यात जखमी झालेल्या 60 लोकांवर उपचार करत आहेत, तर इतर 10 जणांचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. अफगाणिस्तानमधील संस्थेचे व्यवस्थापक  म्हणाले की, सर्जन रात्रीही सेवा देतील. जखमींची वाढती संख्या पाहता बेडची संख्या वाढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.