शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (12:13 IST)

महाकाय अजगारासोबत खेळणारा चिमुकला, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात ज्यांना पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी संताप केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला चक्क अजगरासोबत खेळत आहे. तो चिमुकला त्या अजगराच्या अंगावर बसलेला आहे. साप किती धोकादायक असू शकतो हे आपल्याला चांगलेच माहित आहे. हे व्हिडीओ क्लिप काही सेकंदाचे आहे पण हे पाहून अंगाला थरकाप येतो. हा चिमुकला भल्या मोठ्या अजगरावर बसला आहे आणि खेळत आहे. तेवढ्यात तो अजगर त्यामुलाकडे वळतो आणि काहीक्षण थांबतो. त्या चिमुकल्याला त्या अजगराची काहीच भीती वाटत नाही. उलट तो आनंदात खेळत आहे. 

हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर  rasal_viper नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपले कमेंट्स देत आहे. काहींनी व्हिडीओ बनवणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याचे म्हटले आहे. तर एका युजर्स ने काही सेकंदाच्या व्हिडीओ बनविण्यासाठी मुलाच्या जीवाशी खेळले आहे. असे म्हटले आहे.  एकंदरीत ज्याने हा व्हिडीओ पहिला त्याने संताप केला आहे.