बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बटाटे खाऊन कमी केले 50 किलो वजन

सिडनी- वजन कमी करण्यासाठी मी आता वर्षभर केवळ बटाटेच खाऊन राहणार, असे ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असलेल्या अँड्रयू ‍फ्लिडंर्स टेलर याने म्हणताच, त्याला लोकांनी अक्षरक्ष: वेढ्यात काढले होते. मात्र, फिल्डंर्सने लोकांच्या टिकेची पर्वा न करता केवळ बटाटे खात आपले वजन वर्षात 50 किलोने कमी केले.
 
डॉक्टर अथवा पोषण आहार विशेषज्ञ नेहमीच संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. अशा स्थितीत वर्षभर बटाटे खाऊन 50 किलो वजन कमी करणे म्हणजे डॉक्टरांसाठी ही आश्चर्यकारक ठरले आहे. फिल्डंर्सने एक सायंटिक पेपर वाचला आणि डॉक्टर व डायटिशियन यांच्या मदतीने वजन कमी करण्याची योजना तयार केली. शरीराला जे काही आवश्यक आहे ते सर्व काही आपण बटाट्यापासूनच मिळवू शकतो. असा दावाही फ्लिडंर्सने केला. यासाठी आपण विविधि प्रकाराचे बटाटे खाऊ शकतो, असेही त्याने म्हटले. दैनंदिन आवश्यकतेपेक्षा 600 टक्के जास्त आयर्न आणि 400 टक्क्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी हे महत्त्वाचे घटक तसेच फायबर आपल्याला बटाट्यापासूनच मिळतात.
 
शरीराला असलेले सर्व घटक बटाट्यापासूनच मिळवत फ्लिडंर्सने वजन 50 किलोने कमी केले.