बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:03 IST)

भयंकर : 'तिने' ११ वर्षाच्या मुलावर सेक्सची केली जबरदस्ती

11 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला आपल्यासोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करणा-या महिलेल्या

15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटनच्या मॅनचेस्टरमधील ही घटना आहे. मॅनचेस्टर क्राऊन न्यायालयाने निर्णय सुनावताना महिलेचं हे कृत्य अत्यंत भयंकर दृष्ट असल्याचं म्हटलं आहे. 36 वर्षीय डॉन डेव्हिस यांच्यावर आरोप होता की, त्यांनी पीडित मुलाचा अनेकदा छळ केला असून, आपल्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती केली. 

डॉन डेव्हिसला 2015 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. जवळपास सव्वा दोन वर्षानंतर न्यायालयाने 12 वेळा सुनावणी घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने डेव्हिसल एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.